Tuesday, August 11, 2015

2 रंग प्रितीचा.....

         तुझ्या माझ्या प्रितीचा 
हा असा अंत व्हावा 
न गरजल्या-बरसल्या 
हा मेघ शांत व्हावा


तुझा एका शब्दाखातर 
मी प्यालो विषाचा प्याला 
आतल्या-आत रोज जाळतात 
ह्या हृदयतल्या ज्वाला 

तुझाच निर्णय योग्य होता 
व्यर्थ माझ रुसन 
फाटलेल्या आयुष्यात कुठ 
सजली असती स्वप्न 
मात्र हात हातात घेउन तू 
त्या घेतलेल्या आनाभाका
आजही कसा आयुष्याचा 
रंग करतात फिका

अण फ़िक्या झालेल्या या आयुष्यात 
आता श्वास घेन उरलय 
तू गेली तेव्हाच खरतर 
माझ आयुष्य सरलय 
   
Hit Like If You Like The Post

No comments:

Post a Comment