Tuesday, August 11, 2015

1 अश्रुंचे फुल

माझ्या मुक़ राहण्याची 
तिला जाणीव होती 
माझ्याकडे शब्दांची 
फार उणीव होती

माझ्या पेक्षा जास्त 
ती मला जानत होती 
माझ्या प्रतेक कृतीला 
प्रमाण मानत होती 

कधी-कधी माझ्या डोळ्यात
ती नुसताच पाहत राहायची 
वेड्यासारख अश्रुत 
नुसताच वाहत रहायची 

अन अचानक ती मला 
न सांगताच सोडून गेली 
भातकुली खेळ 
मधेच मोडून गेली 

ती आजही जेव्हा भेटते 
अश्रुंचे फुल वाहते 
माझ्या हृदयात मात्र 
ते शूल बनुन राहते  
Hit Like If You Like The Post

No comments:

Post a Comment