Wednesday, August 12, 2015

३ धग

       ३   धग
फुललेला पडस पाहून
तिची आठवण झाली
तिच्या गो-या गाली कधी
अशीच फुले लाली


आठवतोय तो रंगोंत्सव
अन तिची वेडी धडपड़
नियतीन मांडलेला
तो शेवटचा खेळ 

गोळा  करुन आनलेल्या
त्या पडस फुलांच्या रंगात
रंगत गेली प्रीती
मुरली अंगा-अंगात

मात्र नसीबान शेवटी
कसा स्वप्नांचा भंग केला
हळुहळू  निघून
शरीराचा रंग गेला

मागे उरली फक्त
स्वप्न भंगलेली
भंगलेल्या स्वप्नात
मन रंगलेली

आज मात्र तेच पडस-फुल
निखा-यासम भासते
आरपार ह्रुदयात
त्याचीच धग वसते      
Hit Like If You Like The Post

No comments:

Post a Comment